महाराष्ट्रातील चांगले उद्योग गुजरातला हलवले जात असल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जातो. त्यातच आता महाराष्ट्रातील वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू होणार असल्याची घोषणा झाली. या संदर्भात आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केला आहे.